

अन्न हे व्यक्तीच्या जगण्यासाठी आवश्यक तर आहेच परंतू समाजाच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पण खूप महत्त्वाचे आहे. आवश्यक प्रमाणात आणि पोषक अन्न मिळाल्याने व्यक्तीचा पुरेपूर शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो. अशा सुदृढ व्यक्तींच्या परिश्रमाने अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढते आणि देशाच्या विकासाला चालना मिळते.
अन्न सुरक्षा (Food Security)
अन्न सुरक्षा म्हणजे अशी स्थिती आणि वेळ ज्यावेळी देशातील सर्व लोकांना पुरेशा प्रमाणात, सहजतेने, माफक दरांत आणि पोषक अन्न धान्य मिळते.
अन्न सुरक्षा ही संकल्पना कोणत्याही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी फार महत्त्वाची ठरते. राजकीय क्षेत्रातही हीच्यावरून बरेचदा चर्चा आणि वादविवाद होतात. आपल्यासारख्या लोकशाहीक देशांत तर अन्न सुरक्षा हे सरकारची कामगिरी मापन करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. अन्न धान्याच्या किंमतीत वाढ आणि वाढती महागाई यांवरून सरकारवर बरेचदा टीका ही केली जाते.
अन्न सुरक्षा ही एक व्यापक संकल्पना आहे. हीच्यात खालील बाबींचा समावेश होतो -
1. अन्न उपलब्धता (Food Availability)
देशातील लोकांना किती प्रमाणात आणि किती सहजतेने अन्न धान्य उपलब्ध आहे, ह्याचा यामध्ये समावेश होतो.
हे निकष अन्न उत्पादनाशी संबंधित आहे. म्हणजे, जर देशात पुरेशा प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन झाले तर लोकांच्या आवश्यकतेनुसार ते त्यांना मिळण्याची शक्यता वाढते.
अन्न उपलब्ध करून देण्यात सर्वात मोठा वाटा देशातील शेतकऱ्यांचा असतो. शेवटी, शेतात पिकविलेले अन्न धान्यच लोकांपर्यंत pihchat असते. यामुळेच सरकार शेतकऱ्यासाठी विशेष योजना बनविते, जसे की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN), शेती आवश्यक सामग्रींवर सरकारद्वारे अनुदान (सब्सिडी), ई.
2. सुलभता (Accessibility)
ह्याचा अर्थ होतो की, किती सहजतेने लोकांना अन्न धान्य उपलब्ध होऊ शकते किंवा ते त्यांच्यापर्यंत पोहचू शकतं/पोहचतं.
या निकषामध्ये सरकारची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. आपल्यासारख्या विकसनशील देशांत अन्न धान्याचे वाटप हे लक्षणीय प्रमाणात सरकारच्या हातात असते. सरकार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून अन्न धान्य खरेदी करते, जे मग देशातील लोकांपर्यंत पोहचविले जाते (उदा. रेशन किंवा सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानांतून).
सरकारी किंवा खाजगी अन्न धान्याची दुकानांपर्यंत पोहचणे लोकांना किती सोयीस्कर आहे, देशातील पायाभूत सुविध, जसे की रस्ते, जलमार्ग, रेल्वे, ई. यांचा किती विकास झाला आहे हे या बाबतीत महत्त्वाचे ठरते.
आपल्या देशात बरेचदा असे बघायला मिळते की, देशाच्या एका भागात मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन होते पण साठवायला पुरेशी जागा, पायाभूत सुविधा (उदा. Godown किंवा कोठार) नसल्याने ते खराब होते. तर दुसरीकडे, काही भागांत अन्न धान्य लोकांपर्यंत पोहचत नसल्याने तिथे उपासमार आणि कुपोषणासारख्या समस्या निर्माण होतात.
सामाजिक व्यवस्था आणि कारणे, जसे की, समाजातील वंचित वर्गांचे पृथक्करण, गरिबी आणि महिलांचे परिवारातील आणि समाजातील दुय्यम स्थान यांमुळे पण हे सामाजिक गट अन्नापर्यंत पोहचू शकत नाही.
3. परवडणारीता (Affordability)
जर अन्न धान्याची किंमत खूप जास्त असेल तर समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या गटांना ते परवडत नाही ज्यामुळे ते त्या अन्न धान्यापासून वंचित राहतात (उदा. आपल्या देशात फळांच्या जास्त दरांमुळे बरेच लोक आवश्यक प्रमाणात फळांचे सेवन करू शकत नाहीत).
अन्न महागाई (Food Inflation) हे त्यातल्यात्यात ह्या समस्येला अजून तीव्र बनविते. वाढत्या अन्न धान्यांच्या किमतींमुळे सर्वसामान्य लोकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे उपासमार आणि कुपोषण यांचे प्रमाण आणि तीव्रता वाढते आणि अन्न सुरक्षा धोक्यात येते.
अन्न धान्याची साठेबाजी आणि काळाबाजार यांसारख्या अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे किंमती वाढतात. म्हणून आपल्या देशात जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 (Essential Commodities Act) अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत.
4. उपभोग्यता (Assimilation)
कधी कधी अन्न उपलब्ध असून, सुलभतेने त्यापर्यंत पोहचता येत असून आणि ते परवडणारे असून सुद्धा काही जणांना ते पचविणे आणि त्यातून पुरेसे पोषण मिळविणे अवघड जाते. यामागे बरीच कारणे असू शकतात, जसे की, अन्न नलिका किंवा पचन व्यवस्थेशी संबंधित एखादा आजार किंवा जेवण बनविण्याच्या चुकीच्या पद्धती (उदा. कापून झाल्यावर भाजीपाला पाण्याने धुणे).
भारताच्या अन्न सुरक्षेच्या बाबतीत सांगायचे झाले तर, आज आपण अन्न उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत. गहू, तांदूळ, ऊस, भुईमूग यांत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे (FAO Report नुसार). 2021-22 मध्ये आपल्या देशातील एकूण अन्न उत्पादन हे 315.7 दशलक्ष टन एवढे होते, जे वाढतच जात आहे. तरी देखील आपण स्वतःला अन्न सुरक्षित म्हणू शकत नाही. आपल्या अन्न सुरक्षेला बऱ्याच गोष्टींचा धोका आहे, जसे की -
- मान्सूनवर अवलंबित कृषी
- कृषी निविष्ठांची वाढती किंमत
- पिकांचे नवनवीन रोग आणि आजार
- असमाधानकारक कृषी संशोधन
- सीमांत आणि लहान शेतकऱ्यांच्या समस्या
- अन्न प्रक्रियेतील मागासलेपणा
यांवर विजय मिळवून आपण आपली अन्न सुरक्षा सुदृढ करू शकतो. यातूनच मग देशाच्या सर्वसमावेशी विकासाचा मार्ग मोकळा होइल.
सरावासाठी प्रश्न:
What are the salient features of the National Food Security Act, 2013? How has the Food Security Bill helped in eliminating hunger and malnutrition in India? (UPSC-2021; 250 Words, 15 Marks)
राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम, 2013 की मुख्य विशेषताएं क्या हैं? खाद्य सुरक्षा विधेयक ने भारत में भूख और कुपोषण को दूर करने में किस प्रकार मदद की है?